मराठा बंधू भगिनींनो,
सविनय नमस्कार,
मराठा समाजाने संघटित होऊन, विचारांची देवाण-घेवाण करणे, आप-आपसातील जिव्हाळा वाढविणे, एकमेकांची सुख-दुःखे समजावून घेऊन शैक्षणिक, सामाजिक उत्कर्ष साधणे, समाजातील दारिद्र्य, बेरोजगारी दूर करणे, उद्योजकता वाढीस लावणे व त्यासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य कसे उभे करता येईल यासंबंधीचा विचार करणे, इच्छुकांना मार्गदर्शन करणे यासारख्या समाजाच्या प्रगतीला पोषक गोष्टी आपण केवळ संघटित झाल्यानेच साध्य करता येतील यावर आपण सर्वजण सहमत असालच. आपल्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे त्यातून काही हिस्सा उचलणे, त्यासाठी आवश्यक तो सहभाग देणे ह प्रत्येक मराठा बांधवाने आपले कर्तव्य समजून एकत्र यावे यासाठी मराठा समाज सेवा संघ ही संस्था कार्यरत आहे.
आपण एक जागरुक मराठा, सबळ व ज्ञानी मराठा, भूमिकेतून एकत्र येऊन या सर्व समस्यांवर कशी मात करता येईल यावर विचारमंथन करणेसाठी एकत्र यावे अशी आमची भूमिका आहे आणि म्हणूनच हे आपणांस प्रेमाचे व आग्रहाचे निमंत्रण!
समाजाभिमुख काम करताना व मुंबईतील पूर्व- पश्चिम उपनगरातील कोकणातील मराठा समाज मोठ्या संख्येने असलेल्या विभागात समाजाची स्वतःच्या मालकीची वास्तू असणे अत्यावश्यक वाटते. त्यासाठी आपणासोबत विचारविनीमय करुन आपणा सर्वांच्या सहकार्याने ही वास्तू कशा प्रकारे उभारता येईल यासाठी आपले बहुमोल सहकार्य अपेक्षित आहे.
समाजाच्या उत्कर्षासाठी संस्थेने आजपर्यंत केलेली ढोबळ उपक्रम :
★ १२ ऑक्टोबर २००५-संस्थेची स्थापना
★ सभासदांना दीपावली शुभेच्छा कार्ड नूतनवर्ष शुभेच्छा
★ ऑगस्ट २००६ अस्मिता विद्यालय सभागृहामध्ये मराठा विद्यार्थी गुणगौरव
★ नोव्हेंबर २००६ मराठा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर न्युझिलंड हॉस्टेल, आरे कॉलनी, गोरेगाव
★ मार्च २००७ समाजाच्या मेळावा मार्गदर्शन मुलुंड मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष मा. बळीराम माने
★फेब्रुवारी २००८ स्नेहमेळावा, मराठा भगिनींचा भव्य हळदी कुंकू समारंभ प्रमुख पाहुण्या अॅड. दिपाली शिर्के
★ मे २००८ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन-गणेश पूजन-शामनगर, जोगेश्वरी (पूर्व)
★ जुलै २००८ मराठा विद्यार्थी गुणगौरव समारंभ
★ ऑगस्ट २००८ शेतकी अभ्यास दौरा-स्थळ-जैन इरिगेशन कंपनी, जळगांव
★ सप्टेंबर २००८ प्रथम वार्षिक सर्व साधारण सभा-पंत फौंडेशन सभागृह, मेघवाडी
★ ऑक्टोबर २००८ संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी
★ डिसेंबर २००८ मराठा विद्यार्थी गुणगौरव समारंभ
★ जानेवरी २००९ राधाबाई चाळ दुर्घटनेतील विस्थापित मराठा कुटुंबियांना आर्थिक सहाय्य
★ जानेवारी २००९ मराठा महिला हळदी कुकूं/तिळगुळ समारंभ प्रमुख पाहुण्या अभिनेत्री सौ. निमल शिर्के
★ ८ मार्च २००९ जागतिक महिला दिन समारंभ, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम
★ जानेवारी २०१० करिअर मार्गदर्शन शिबिर- अस्मिता विद्यालय-मार्गदर्शन मा. आनंद म्हापूसकर
★ दरवर्षी हळदी कुकूं व तिळगुळ समारंभ
★ मार्च २०१० जागतिक महिला दिन नाना-नानी पार्क, सर्वोदय
★ मार्च २०१० गुढीपाडवा सांस्कृतिक दिंडी-मिरवणूक
★ डिसेंबर २०१० मराठा दिनदर्शिका प्रकाशन श्री समर्थ विद्यालय
★ मार्च २०११ हळदी कुकूं व तिळगुण समारंभ
★ मार्च २०११ जागतिक महिला व हळदी कुकूं समारंभ प्र. पाहुण्या-कु. पुर्वा प्रमोद पवार
★ दहा गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय फी
● प्रतिवर्षी मराठा दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते
● प्रतिवर्षी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक सहाय्य करण्यात येते. थंड पेयाचे वाटप केले जाते.
● प्रतिवर्षी गणेश विसर्जन मिरवणूकीत प्रसाद वाटप व
● मराठा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो
● प्रतिवर्षी वधू-वर केंद्राच्यावतीने मराठा समाजातील वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येतो.
।। जय भवानी ।। ।। जय शिवराय ||